जाणून घ्या काय होता प्रश्न ?
यात्रेमध्ये कोणता प्राणी किती किंमती मध्ये मिळतो ते पाहुयात.
* १० रुपयाला - १
हत्ती
* १ रुपयाला - १
घोडा
* १ रुपयाला - ८
उंट
म्हणजेच १ उंट १/८ रुपयांना मिळतो.
समजा आपण ' क्ष ' हत्ती, ' य ' घोडे आणि ' ज्ञ ' उंट घेतले तर क्ष हत्तींची किंमत होईल १०क्ष, य घोड्यांची किंमत होईल १य आणि ज्ञ उंट (१/८)ज्ञ रुपयांना पडतील.
आपल्याजवळ १०० रुपये आहेत म्हणजे -
१०क्ष + य + (१/८)ज्ञ = १०० ......... (१)
आणि आपल्याला एकूण १०० प्राणी घ्यायचे आहेत म्हणजेच -
क्ष + य + ज्ञ = १००
य = १०० - क्ष - ज्ञ ....... (२)
समीकरण (२) हे (१) मध्ये टाकल्यानंतर,
१०क्ष + (१०० - क्ष - ज्ञ) + (१/८)ज्ञ = १००
९क्ष + १०० - ज्ञ + (१/८)ज्ञ = १००
९क्ष - (७/८)ज्ञ = ०
९क्ष = (७/८)ज्ञ
क्ष/ज्ञ = ७/७२.
याचाच अर्थ क्ष = ७ आणि ज्ञ = ७२ व म्हणूनच य = १०० - क्ष - ज्ञ = १०० - ७ - ७२ = २१ असू शकतो.
म्हणजेच आपण ७० रुपयांचे ७ हत्ती, २१ रुपयांचे २१ घोडे आणि ९ रुपयांचे ७२ उंट खरेदी करायला हवेत जेणेकरून १०० रुपयांमध्ये १०० प्राण्यांची खरेदी पूर्ण होईल.
एकूण खर्च = ७० + २१ + ९ = १००.
एकूण प्राणी = ७ + २१ + ७२ = १००.