Posts

गोष्ट विषमासूर नावाच्या राक्षसाची !

विषमासूर नावाच्या राक्षसाच्या समोर 1000 माणसे एका रांगेत उभी आहेत. त्या रांगेमधील विषम क्रमांकावर [ उदा. 1,3,5,7,9 ] उभ्या असलेल्या सर्व लोकांना विषमासूर खावून टाकतो. 

त्या नंतर उरलेल्या माणसांची रांग शिल्लक राहते. आता त्या रांगेतील विषम क्रमांकाच्या माणसांना विषमासूर खावून टाकतो. 

असे करत करत रांग लहान होत जाते आणि शेवटी एक माणूस शिल्लक राहतो. तर तो शिल्लक राहिलेला माणूस मूळ 1000 लोकांच्या रांगेत कितव्या क्रमांकावर उभा असेल ?

या क्रमांकावरील व्यक्ती शेवटी उरेल. पहा कोणता आहे तो क्रमांक! 



Goshta Vishmasur navachya rakshasachi




विषमासुराच्या गोष्टीतील शेवटचा माणूस !


काय बरं होती हि गोष्ट ?

समजा,  त्या रांगेत फक्त १०च माणसे होती तर प्रत्येक फेरीनंतर वाचलेली माणसे या क्रमांकांवर असतील -

(१)  २  ४  ६  ८  १०
(२)  ४  ८
(३)  ८

तर व्या क्रमांकावरील व्यक्ती शेवटी उरेल.

आता त्या रांगेत ५० माणसे होती असे समजूयात.

(१)  २  ४  ६  ८  १०  १२  १४  १६  १८  २०  २२  २४  २६  २८  ३०  ३२  ३४  ३६  ३८  ४०  ४२  ४४  ४६  ४८  ५०
(२)  ४  ८  १२  १६  २०  २४  २८  ३२  ३६  ४०  ४४  ४८
(३)  ८  १६  २४  ३२  ४०  ४८
(४)  १६  ३२  ४८
(५)  ३२

म्हणजेच, ३२ क्रमांकावरील व्यक्ती शेवटी उरेल.

ही रांग आता १०० माणसांची होती असे समजूयात.

(१)  २  ४  ६  ८  १०  १२  १४  १६  १८  २०  २२  २४  २६  २८  ३०  ३२  ३४  ३६  ३८  ४०  ४२  ४४  ४६  ४८  ५०
      ५२  ५४  ५६  ५८  ६०  ६२  ६४  ६६  ६८  ७०  ७२  ७४  ७६  ७८  ८०  ८२  ८४  ८६  ८८  ९०  ९२  ९४  ९६
      ९८  १००

(२)  ४  ८  १२  १६  २०  २४  २८  ३२  ३६  ४०  ४४  ४८  ५२  ५६  ६०  ६४  ६८  ७२  ७६  ८०  ८४  ८८  ९२  ९६  १००

(३)  ८  १६  २४  ३२  ४०  ४८  ५६  ६४  ७२  ८०  ८८  ९६

(४)  १६  ३२  ४८  ६४  ८०  ९६

(५)  ३२  ६४  ९६

(६)  ६४

या वेळी ६४ क्रमांकाचा व्यक्ती शेवटी राहील.

वरील तिन्ही उदाहरणे बारकाईने पाहिल्यास असे लक्षात येते कि शेवटी उडणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक हा त्या एकूण क्रमांकांपैकी सर्वात मोठा २ चा घात (Biggest Power of 2) आहे. उदा. १ ते १० साठी ८, १ ते ५० साठी ३२ आणि १ ते १०० साठी ६४.

याचे कारण, अंतिमपूर्व फेरीमध्ये या क्रमांकाच्या निम्मा क्रमांकाचे प्रथम स्थानावर असणे होय जेणेकरून हा क्रमांक सम स्थानांवर उभा असेल. उदा. १ ते १० साठी ४,८ तसेच १ ते ५० साठी १६,३२ आणि १ ते १०० साठी ३२,६४.

याच तर्कानुसार आपण निष्कर्ष काढू शकतो कि, १००० माणसे रांगेत उभे असतील तर ५१२ क्रमांकाचा व्यक्ती शेवटी उरेल कारण ५१२ हाच २ चा सर्वात मोठा घात (Biggest Power of 2) आहे.

vishamasurachya goshtitil shevatacha manus


आणि समजा १०२५ माणसे रांगेत असती तर १०२४ क्रमांकाचा व्यक्ती शेवटी उरला असता.

अंतिम फेरीमध्ये मात्र हा व्यक्ती विषम स्थानावर (१) असेल आणि त्याचे काय करतो हे गोष्टींमध्ये नमूद केले नाही.


Follow me on Blogarama